मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaDharashiv Police Emblemधाराशिव पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ
  • संपर्क करा
Dharashiv Police

धाराशिव पोलीस

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव, महाराष्ट्र, भारत

नियंत्रण कक्ष · 02472-222700sp.osmanabad@mahapolice.gov.in

विभाग

  • आमच्याबद्दल
  • नेतृत्व
  • संघटनात्मक रचना
  • संपर्क करा
  • ठिकाणे
  • माहिती अधिकार

सेवा

  • ई-चलान पेमेंट
  • ऑनलाइन एफआयआर नोंदवा
  • पोलीस क्लिअरन्स
  • बेपत्ता व्यक्ती
  • तक्रार
  • अभिप्राय

मदत व माहिती

  • तातडीची मदत: १००
  • हेल्पलाईन: १०९०
  • महिला हेल्पलाईन
  • निविदा
  • भरती

धाराशिव पोलीस

धाराशिव पोलीस

साइट मॅपअस्वीकरणअटी आणि शर्तीगोपनीयता धोरण
शेवटचे अपडेट: २० नोव्हेंबर, २०२६ रोजी ०६:०१ PM वाजताअभ्यागत 551

© 2026 धाराशिव पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे
Dharashiv Police Chat AI
सुरक्षा मित्र
आयुक्त भेटीची वेळ घ्या
धाराशिव पोलीस सेवा (WhatsApp)
Accessibility
Instagram
Facebook
WhatsApp Channel

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

धाराशिव जिल्हा पोलिसांतर्फे 'सायबर सुरक्षा जनजागृती रॅली' व 'एकता रॅली'चे  आयोजन.

धाराशिव जिल्हा पोलिसांतर्फे 'सायबर सुरक्षा जनजागृती रॅली' व 'एकता रॅली'चे आयोजन.

धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातून सायबर सुरक्षा जनजागृती व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या उपस्थितीत रॅलीचा शुभारंभ झाला. यामध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार व विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सायबर गुन्हेगारी, ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे उपाय आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहावे व सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

कम्युनिटि पोलीसींग अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन.

कम्युनिटि पोलीसींग अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन.

मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली कम्युनिटि पोलीसींग अंतर्गत चाइल्ड राइट्स अँड यू (CRY) मुंबई या संस्थेमार्फत बाल हक्क व बाल सुरक्षा विषयक कार्यक्रम आज दि.28.11.2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथील सभागृहात आयोजीत करण्यात आला होता. सदर कार्यक्रमा दरम्यान शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींना मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम यांनी पोलीसांविषयी समज-गैरसमज, बाललैंगिक अत्याचार, भारतीय न्याय संहिता व पोक्सो अधिनियमातील बालकांचे सुरक्षे संबधित असेलेल्या कलमाबाबत, व्यसनमुक्ती, गुड टच-बॅड टच, डायल 112, 1098, सायबर गुन्हे, सोशल मिडियां विषयांच्या गुन्हा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन व समुपदेशन केले. तसेच किशोरी मुलींचे, शिक्षण, संरक्षण, नेतृत्व विकास सर्वांगीण उन्नती व्हावी यासाठी मुलींनी शिक्षण त्यांचे करिअर या बाबत मार्गदर्शन करुन शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या. सदरवेळी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती आनघा घोडगे, पोलीस उपनिरीक्षक श्री इकबाल सय्यद, पोलीस नाईक सारफळे हे उपस्थितीत होते.

पोलीस वर्धापन सप्ताहानिमीत्त पोलीस दलाकडुन विवीध कार्यक्रमाचे आयोजन

पोलीस वर्धापन सप्ताहानिमीत्त पोलीस दलाकडुन विवीध कार्यक्रमाचे आयोजन

दि.02.01.2026 ते दि. 08.01.2026 या सप्ताहा दरम्यान महाराष्ट्र राज्यात पोलीस दलाच्या वतीने ‘पोलीस वर्धापन दिन कार्यक्रम’ साजरा केला जातो. त्या अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा पोलीस दलामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस संगीत वाद्य पथकाद्वारे जनजागृती तसेच देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम दि.05.01.2026 रोजी दरम्यान करण्यात आला. यावेळी धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, साठे चौक, मध्यवर्ती शासकीय इमारत चौक इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणी धाराशिव पोलीस दलातील संगीत वाद्य पथकातील पोलीस अंमलदार- बालाजी सहाणे, लक्ष्मण चांदणे, श्रीमंत पालके, रामहरी कांबळे, विकास कसबे,नितीन रणखांबे यांनी उत्कृष्टरित्या जनजागृती तसेच देशभक्तीपर गीतांचे गायन केले. आज दि.08.01.2026 रोजी पोलीस मुख्यालय धाराशिव येथील सभागृहात पोलीस वर्धापन दिनानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान राखीव पोलीस निरीक्षक, श्री. जाकेरलाला पठाण, राखीव पोलीस उप निरीक्षक श्री. काटे, महिला पोलीस उप निरीक्षक श्री. अनघा गोडगे, पोलीस हवालदार सचिन देडे, पोलीस अंमलदार किरण सहाणे, महिला पोलीस अंमलदार शेंडगे यांनी भोसले हायस्कुलचे शाळेतील 500 विद्यार्थी- विद्यार्थींनी पोलीसां विषयी समज-गैरसमज, मुली व महिलांची सुरक्षीतता व सुरक्षेच्या मुद्यांवर, पोलीस दलातील करियरच्या संधी यावर मार्गदर्शन केले, पोलीस मुख्यालय येथे विद्यार्थी यांना शस्त्रे तसेच त्यांना आवडीचे व कुतूहल निर्माण करणारे साहित्य दाखविले. तसेच देशभक्तीपर गीतांचे गायन करुन माहिती देण्यात आली.

कम्युनिटी पोलीसींग अंतर्गत तामलवाडी पोलीसांची शाळेस भेट.

कम्युनिटी पोलीसींग अंतर्गत तामलवाडी पोलीसांची शाळेस भेट.

मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली कम्युनिटि पोलीसींग स्कीम अंतर्गत तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर, महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक- अमृता पटाईत,पोलीस उप निरीक्षक जाकिर पटेल, पोलीस हावलदार- तेलप, पवार तसेच महिला पोलीस हावलदार- सोनाली जाधव, महिला पोलीस नाईक रोहिणी धुमाळ, पिंक पथक बीट अंमलदार संजय राठोड , वैशाली कोरे, आकाश सुरनर यांचेसह पोलीस पथकाने आज दि.08 नोव्हेंबर रोजी 09.30 ते 10.40 वा. सु. सरस्वती विद्यालय तामलवाडी येथे भेट दिली. त्यावेळी शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींना पोलीसांविषयी समज-गैरसमज, वाहतुकीचे नियम, बाललैंगिक अत्याचार, भारतीय न्याय संहिता व पोक्सो अधिनियमातील बालकांचे सुरक्षे संबधित असेलेल्या कलमाबाबत, व्यसनमुक्ती, गुड टच-बॅड टच, डायल 112, 1098, सायबर गुन्हे, सायबर आवरनेस तसेच सोशल मिडियां विषयांच्या गुन्हा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन व समुपदेशन केले. तसेच शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या. सदर भेटी दरम्यान शाळेचे सरस्वती विद्यालय शाळेचे 925 विद्यार्थी, मुख्याध्यापक वडणे, शिक्षक वृंद, कर्मचारी माजी सरपंच दत्ता वडणे तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थितीत होते.

कम्युनिटि पोलीसींग अंतर्गत तामलवाडी पोलीसांची शाळेस भेट.

कम्युनिटि पोलीसींग अंतर्गत तामलवाडी पोलीसांची शाळेस भेट.

मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली कम्युनिटि पोलीसींग अंतर्गत तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस हावलदार- पंडीत शिंदे, नितीन मुळे, सायबर पोलीस ठाण्याचे पोअं मकसुद काझी, नितीन भोसले, गोपाल सलगर, उमेश माने व मपोहेकॉ कोरे यांचेसह पोलीस पथकाने आज दि.06 डिसेंबर रोजी 10.30 ते 11.30 वा. सु. सनराईज स्कुल तामलवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त भेट दिली. त्यावेळी शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींना पोलीसांविषयी समज-गैरसमज, वाहतुकीचे नियम, बाललैंगिक अत्याचार, भारतीय न्याय संहिता व पोक्सो अधिनियमातील बालकांचे सुरक्षे संबधित असेलेल्या कलमाबाबत, व्यसनमुक्ती, गुड टच-बॅड टच, डायल 112, सायबर गुन्हे, सोशल मिडियां विषयांच्या गुन्हा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन व समुपदेशन केले. तसेच शाळेतील विदयार्थी-विदयार्थींनींच्या अडीअडचणी जाणुन घेतल्या. सदर भेटी दरम्यान सनराईज स्कुल 800 विद्यार्थी, शिक्षक उपस्थितीत होते.

धाराशिव पोलिस दलात वॉर रूमची स्थापना: गुन्हे अन्वेषणात तांत्रिक आणि मानवी समन्वयाचा एक नवीन अध्याय.

धाराशिव पोलिस दलात वॉर रूमची स्थापना: गुन्हे अन्वेषणात तांत्रिक आणि मानवी समन्वयाचा एक नवीन अध्याय.

दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगरचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेन्द्र मिश्र यांच्या हस्ते धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या वॉर रूमचे उद्घाटन संपन्न झाले. ही वॉर रूम जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रण, कायदा व सुव्यवस्थेचे व्यवस्थापन आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेसाठी एक अत्यंत महत्त्वाचे साधन ठरणार आहे. वॉर रूमचे उद्दिष्ट आणि कार्यपद्धती : 1. गुन्हे तपासात समन्वयः विविध शाखांतील वरिष्ठ अधिकारी एकत्रितपणे गुन्ह्यांचा तपास, बंदोबस्त नियोजन आणि आकस्मिक प्रतिसाद यासाठी समन्वय साधू शकतील. 2. तांत्रिक साधनांचा वापर: फॉरेन्सिक अहवाल, CDR/SDR विश्लेषण, सायबर ट्रेसिंग, GIS मॅपिंग यांचा वापर करून तपास अधिक प्रभावी केला जाईल. 3. ड्रोनद्वारे थेट प्रसारण: मोर्चे, रेड, कॉम्बिंग ऑपरेशन आणि बंदोबस्ताच्या ठिकाणी ड्रोनद्वारे थेट दृश्य प्रसारणामुळे घटनास्थळी नियंत्रण ठेवणे अधिक सुलभ होईल. 4. सांख्यिकीय माहितीचे संकलन: जिल्ह्यातील सर्व गुन्ह्यांची माहिती, गुन्हेगारांचे प्रोफाइल, घटनास्थळांचे नकाशे आणि तपासाची प्रगती एकत्रितपणे संकलित केली जाईल. 5. वेळेवर निर्णय प्रक्रिया: कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगी तात्काळ आणि माहितीवर आधारित निर्णय घेणे शक्य होईल. या उद्घाटन प्रसंगी श्री. मिश्र यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत वॉर रूमच्या स्थापनेमुळे धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला. उद्घाटन सोहळ्याला पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. निलेश देशमुख (तुळजापूर), श्री. संजय पवार (कळंब), श्री. अनिल चोरमले (भूम), श्री. सदाशिव शेलार (उमरगा), श्री. सुरेशकुमार राऊत (धाराशिव शहर), श्रीमती अश्विनी भोसले (आर्थिक गुन्हे शाखा), श्री. विनोद ईज्जपवार (स्थानिक गुन्हे शाखा), श्री. अमोद भुजबळ (जिल्हा विशेष शाखा), श्री. शकील शेख (सायबर), श्री. प्रमोद भिंगारे (तांत्रिक विश्लेषण शाखा), श्री. सोमवंशी (एटीसी), श्रीमती घोगरे, श्री. चासकर, श्री. हिंगोले आदी अधिकारी उपस्थित होते.

एकूण 3 पैकी पान 1

मागील
पुढील