मुख्य मजकुराकडे जा
National Emblem of IndiaNational Emblem of IndiaDharashiv Police Emblemधाराशिव पोलीसमहाराष्ट्र पोलीस
  • मुख्यपृष्ठ
  • संपर्क करा
Dharashiv Police

धाराशिव पोलीस

सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय

पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव, महाराष्ट्र, भारत

नियंत्रण कक्ष · 02472-222700sp.osmanabad@mahapolice.gov.in

विभाग

  • आमच्याबद्दल
  • नेतृत्व
  • संघटनात्मक रचना
  • संपर्क करा
  • ठिकाणे
  • माहिती अधिकार

सेवा

  • ई-चलान पेमेंट
  • ऑनलाइन एफआयआर नोंदवा
  • पोलीस क्लिअरन्स
  • बेपत्ता व्यक्ती
  • तक्रार
  • अभिप्राय

मदत व माहिती

  • तातडीची मदत: १००
  • हेल्पलाईन: १०९०
  • महिला हेल्पलाईन
  • निविदा
  • भरती

धाराशिव पोलीस

धाराशिव पोलीस

साइट मॅपअस्वीकरणअटी आणि शर्तीगोपनीयता धोरण
शेवटचे अपडेट: २० नोव्हेंबर, २०२६ रोजी ०६:०१ PM वाजताअभ्यागत 551

© 2026 धाराशिव पोलीस. सर्व हक्क राखीव.

डिझाइन आणि विकसित Dreamcare Developers द्वारे
Dharashiv Police Chat AI
सुरक्षा मित्र
आयुक्त भेटीची वेळ घ्या
धाराशिव पोलीस सेवा (WhatsApp)
Accessibility
Instagram
Facebook
WhatsApp Channel

उपक्रम

पोलीस प्रकल्प आणि सामुदायिक पोलीस कार्यक्रम.

धाराशिव जिल्हातील पोलीस दलात वार्षीक तपासणी दरम्यान विविध शाखेचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उदघाटन

धाराशिव जिल्हातील पोलीस दलात वार्षीक तपासणी दरम्यान विविध शाखेचे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते उदघाटन

आज दि 27/03/2025 रोजी धाराशिव शहर पोलीस ठाणेच्या कामकाजाची पाहणी करुन पोलीस स्टेशन परिसरातील ऑक्सीजन पार्कचे उदघाटन करुन वृक्षारोपन केले. धाराशिव शहर पोलीस ठाणे येथील बांधकामाचे नुतनीकरण करुन वाचनालयाची उभारणी करण्यात आली असुन मा.श्री. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, परिक्ष्ेत्र छत्रपती संभाजीनगर यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. . पोलीस ठाणे धाराशिव शहरला ISO 9001 चा दर्जा प्राप्त झाला त्या बद्दल मा विशेष पोलीस महानिरीक्षक,छत्रपती संभाजीनगर यांनी प्रमाण पत्र प्रदान करुन गौरव केला. तसेच वाहतुक नियंत्रण शाखा, धाराशिव चे कार्यालय हे धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे परिसरात जुन्या कार्यालयात कार्यरत होते त्यानंतर जिल्हा वाहतुक शाखा नियत्रंण शाखा, धाराशिव चे कार्यालय हे जुने झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय धाराशिव चे बाजूला पोलीस पेट्रोलपंपा शेजारी हलविण्यात आले होते. आज रोजी जिल्हा वाहतुक शाखा धाराशिव चे उदघाटन मा विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांचे हस्ते करण्यात आले मा विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर यांनी मोटर परिवाहन शाखेच्या कामाकाजाची पाहणी करुन आढावा घेतला. पोलीस मुख्यालयात संकल्प बहुउद्देशीय सभागृहाचे उदघाटन मा विशेष पोलीस महानिरीक्षक,छत्रपती संभाजीनगर यांचे हस्ते करण्यात आले संकल्प बहुउद्देशीय सभागृह पोलीसांचे विविध कार्यक्रमा करीता खुला करण्यात आले आहे. सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक, श्री. संजय जाधव, मात्रअपर पोलीस अधीक्षक, श्रीमती शफकत आमना, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक,छत्रपती संभाजीनगर यांचे वाचक श्री भोये, वाहतुक शाखेचे सपोनि श्री. बेंद्रे वाहतुक शाखा धाराशिव व इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी 100 दिवसाची कृती आराखडा च्याअनुषंगाने जिल्हयातील पोलीस अधिकारी अंमलदार यांचेकरिता नविीन कायद्याचे प्रशिक्षण सत्र आयोजीत केले

मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी 100 दिवसाची कृती आराखडा च्याअनुषंगाने जिल्हयातील पोलीस अधिकारी अंमलदार यांचेकरिता नविीन कायद्याचे प्रशिक्षण सत्र आयोजीत केले

भारतीय संसदेने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे तीन कायदे पारित केले असुन त्यांची अंमलबजावणी दि.01/07/2024 पासुन सुरू झालेली आहे. नविन कायदयाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी आणि जनसामान्य व अंमलबजावणी यंत्रणेला कायद्याची ओळख करून देण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक यांचे स्तरावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणे बाबत मा.मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांनी त्यांच्या 100 दिवसाची कृती आराखडा च्याअनुषंगाने सुचना दिलेल्या आहेत सदर प्रशिक्षणास मा.मुख्य शासकीय अभियोक्ता श्री महेंद्र देशमुख यांनी मार्गदर्शन केले

पोलीस ठाणे भुम अंतर्गत वालवड येथे मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव साहेब यांचे हस्ते CCTV चे उदघाटन करण्यात आले सदरवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गौरीप्रसाद हिरेमठ व पोलीस ठाणे प्रभारीपोलीस निरीक्षक श्री प्रल्हाद सुर्यवंशी व इतर नागरीक उपस्थित होते

पोलीस ठाणे भुम अंतर्गत वालवड येथे मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव साहेब यांचे हस्ते CCTV चे उदघाटन करण्यात आले सदरवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गौरीप्रसाद हिरेमठ व पोलीस ठाणे प्रभारीपोलीस निरीक्षक श्री प्रल्हाद सुर्यवंशी व इतर नागरीक उपस्थित होते

पोलीस ठाणे भुम अंतर्गत वालवड येथे मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव साहेब यांचे हस्ते CCTV चे उदघाटन करण्यात आले सदरवेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गौरीप्रसाद हिरेमठ व पोलीस ठाणे प्रभारीपोलीस निरीक्षक श्री प्रल्हाद सुर्यवंशी व गावातील नागरीक उपस्थित होते

मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयातील नवीन जीम येथे पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच नागरीकांकरीता नवीन कायदेविषयक कार्यशाळा संपन्न

मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालयातील नवीन जीम येथे पोलीस अधिकारी/अंमलदार तसेच नागरीकांकरीता नवीन कायदेविषयक कार्यशाळा संपन्न

मा.पोलीस अधिक्षक धाराशिव श्री संजय जाधव यांचे मार्गदशर्नाखाली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, अंमलदार व नागरिकासाठी पोलीस मुख्यालयातील नविन जीम येथे जिल्हा स्थरावरील नविन तीन कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन आज दि. 17/03/2025 रोजी 1100 करण्यात आले. सदर कार्यशाळेमध्ये ॲड श्री. एम. एन चव्हाण, विधी अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव, व ॲड अमोल गुंड चिफ डीएलएसए यांनी नविन तीन कायद्याखाली मार्गदर्शन केले. कार्यशाळेत पोलीस अधिकारी अंमलदार यांनी विचारलेल्या शंकेचे श्री चव्हाण व श्री गुंड यांनी निरसन करुन आवश्यक ते मार्गदर्शन केले सदर कार्याक्रमावेळी पोलीस उप अधिक्षक मुख्यालय पोलीस निरीक्षक श्री. पाटील, धाराशिव जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी, अमंलदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूण 3 पैकी पान 3

मागील
पुढील