
धाराशिव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालय कर्मचारी यांचे करिता पोलीस अधीक्षक कार्यालय व शासकीय रुग्णालय धाराशिव यांचे संयुक्त विद्यमाने पोलीस मुख्यालय धाराशिव येथील अलंकार हॉल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे नमूद शिबिरामध्ये रक्त तपासणी, मधुमेह, उच्च रक्तदाब, कान, नाक, घसा, डोळे, दात व ईसीजी इत्यादी तपासणी करण्यात आल्या सदर शिबिराचा लाभ पोलीस अधिकारी अंमलदार व मंत्रालय कर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात घेतला आहे