
पोलीस अधिक्षक कार्यालय : सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी/अंमलदारांचा निरोप समारंभ हा पोलीस अधिक्षक कार्यालय येथे महिना अखेरीस नियमीतपणे आयोजित केला जातो. धाराशिव पोलीस दलातील सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री शरद घुगे, पोलीस हवालदार श्री सयाजी विठठल रोकडे या 02 व्यक्तींचा सेवानिवृत्त निरोप समारंभ आज दि. 30.09.2025 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय सभागृहात मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. निरोप समारंभादरम्यान पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमास सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार हे कुटूंबीयांसह उपस्थित होते. समारंभादरम्यान नोकरीतील अनुभव कथन करताना सेवानिवृत्त अधिकारी- अंमलदार यांचे डोळे पानावले. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार हजर होते