जिल्हा विशेष शाखा

जिल्हा विशेष शाखा Officers

About Us

जिल्हा विशेष शाखेचे कार्य :

जिल्हा पोलिस संघटनेच्या संरचनेत जिल्हा विशेष शाखेला महत्त्वाचे स्थान आहे. ही शाखा जिल्ह्यातील सण, निवडणुका, परीक्षा, तसेच VIP आणि VVIP भेटी दरम्यान सुरक्षा व्यवस्था आखते आणि पोलीस ठाण्यांशी समन्वय ठेवते.

ही शाखा विविध संघटनांच्या हालचाली, चळवळी आणि राजकीय पक्षांच्या हालचालींविषयी गुप्त माहिती अगोदरच गोळा करते. ही माहिती विश्लेषित करून राज्य गुप्तवार्ता विभाग (SID) व संबंधित पोलीस ठाण्यांना आवश्यक कारवाईसाठी पाठवली जाते.

ही शाखा चारित्र्य पडताळणी, पासपोर्ट पडताळणी आणि विविध परवान्यांच्या शिफारशीचीही जबाबदारी पार पाडते.

जिल्हा विशेष शाखेच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या :

  1. गुप्त माहिती गोळा करणे आणि तिचे विश्लेषण करणे.
  2. जिल्ह्यातील संवेदनशील (महत्त्वाची स्थाने) ठिकाणांची तपासणी करणे.
  3. Indian Secret Act 1923 च्या कलम 8(1) नुसार शहर व जिल्ह्याचे प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करून त्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन शासनाला सुपूर्द करणे.
  4. जिल्ह्यात येणाऱ्या परदेशी नागरिकांची माहिती गोळा करणे.
  5. चारित्र्य पडताळणी, पासपोर्ट पडताळणी करणे.
  6. उपोषण, आत्मदहनाच्या घटनांची माहिती गोळा करणे.
  7. VIP, VVIP आणि महत्त्वाच्या व्यक्तींसाठी सुरक्षा व्यवस्था आखणे.
  8. निवडणुका व मोठ्या सण उत्सवासाठी सुरक्षा व्यवस्था आखणे.
  9. राजकीय पक्ष व त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे.


पासपोर्ट सेवा :

ही शाखा पासपोर्ट अर्जात नमूद केलेल्या माहितीसाठी पडताळणी करते.

पासपोर्टबाबत अधिक माहितीकरिता कृपया www.passportindia.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.


Email ID: dsb-dharashiv@mah.gov.in