
आज दि. 27/03/2025 रोजी सायबर गुन्ह्याचा तपास आधुनिक पध्दतीने करण्या करीता पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव येथे आधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्ज सायबर लॅबची उभारणी करण्यात आली आहे. सदर सायबर लॅबचे मा. श्री. वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक,छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक, श्री. संजय जाधव. मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना. पोलीस उप अधिकक्षक मुख्यालय श्री. मनिष पाटील, सायबर पोलीस ठाण्याचे सपोनि भिंगारे, कासुळे व इतर अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.