
दि.02.01.2026 ते दि. 08.01.2026 या सप्ताहा दरम्यान महाराष्ट्र राज्यात पोलीस दलाच्या वतीने ‘पोलीस वर्धापन दिन कार्यक्रम’ साजरा केला जातो. त्या अनुषंगाने मा.पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा पोलीस दलामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस संगीत वाद्य पथकाद्वारे जनजागृती तसेच देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम दि.05.01.2026 रोजी दरम्यान करण्यात आला. यावेळी धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, साठे चौक, मध्यवर्ती शासकीय इमारत चौक इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणी धाराशिव पोलीस दलातील संगीत वाद्य पथकातील पोलीस अंमलदार- बालाजी सहाणे, लक्ष्मण चांदणे, श्रीमंत पालके, रामहरी कांबळे, विकास कसबे,नितीन रणखांबे यांनी उत्कृष्टरित्या जनजागृती तसेच देशभक्तीपर गीतांचे गायन केले. आज दि.08.01.2026 रोजी पोलीस मुख्यालय धाराशिव येथील सभागृहात पोलीस वर्धापन दिनानिमीत्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान राखीव पोलीस निरीक्षक, श्री. जाकेरलाला पठाण, राखीव पोलीस उप निरीक्षक श्री. काटे, महिला पोलीस उप निरीक्षक श्री. अनघा गोडगे, पोलीस हवालदार सचिन देडे, पोलीस अंमलदार किरण सहाणे, महिला पोलीस अंमलदार शेंडगे यांनी भोसले हायस्कुलचे शाळेतील 500 विद्यार्थी- विद्यार्थींनी पोलीसां विषयी समज-गैरसमज, मुली व महिलांची सुरक्षीतता व सुरक्षेच्या मुद्यांवर, पोलीस दलातील करियरच्या संधी यावर मार्गदर्शन केले, पोलीस मुख्यालय येथे विद्यार्थी यांना शस्त्रे तसेच त्यांना आवडीचे व कुतूहल निर्माण करणारे साहित्य दाखविले. तसेच देशभक्तीपर गीतांचे गायन करुन माहिती देण्यात आली.