Citizen Charter

नागरिक सनद

धाराशिव जिल्हा पोलीस दल

प्रस्तावना

धाराशिव जिल्हा पोलीस दल हे नागरिकांच्या जीवन, मालमत्ता व स्वातंत्र्याचे संरक्षण, कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी आणि सुरक्षित समाज निर्मिती यासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांना पारदर्शक, जलद, नि:पक्षपाती व जबाबदार सेवा देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.

आमची उद्दिष्टे

  • कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे
  • गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण
  • नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे
  • पीडितांना वेळेत व न्याय्य मदत प्रदान करणे
  • महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक व दुर्बल घटकांचे संरक्षण

नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सेवा

1. तक्रार नोंदणी
  • कोणतीही तक्रार विनामूल्य नोंदवली जाईल
  • तक्रारदाराशी सौजन्यपूर्ण वागणूक
  • तक्रारीची नोंद क्रमांकासह पावती दिली जाईल
2. एफ.आय.आर. (FIR) नोंद
  • दखलपात्र गुन्ह्यांमध्ये तात्काळ FIR नोंद
  • FIR ची प्रत तक्रारदारास उपलब्ध करून देणे
3. महिलांसाठी सेवा
  • महिलाविषयक तक्रारींची तात्काळ दखल
  • महिला पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्यांमार्फत चौकशी
  • महिला हेल्पलाईन व समुपदेशन सुविधा
4. वाहतूक सेवा
  • वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी
  • अपघातग्रस्तांना तात्काळ मदत
  • वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना
5. आपत्कालीन सेवा
  • 112 आपत्कालीन सेवेवर तात्काळ प्रतिसाद
  • नैसर्गिक आपत्ती किंवा गंभीर परिस्थितीत मदत

सेवा देण्याची कालमर्यादा

  • आपत्कालीन प्रतिसाद : तात्काळ
  • FIR नोंद : कायदेशीर तरतुदीनुसार त्वरित
  • अर्ज / निवेदन : योग्य कालावधीत निपटारा

नागरिकांची कर्तव्ये

  • कायद्याचे पालन करणे
  • पोलीस तपासात सहकार्य करणे
  • खोटी माहिती देणे टाळणे
  • सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखणे

तक्रार निवारण व्यवस्था

जर नागरिकांना दिलेल्या सेवांबाबत तक्रार असल्यास:

  • संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी
  • ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करावा

संपर्क व उपलब्धता

  • पोलीस ठाणी : 24x7 कार्यरत
  • आपत्कालीन क्रमांक : 112
  • अधिकृत वेबसाइट : धाराशिव जिल्हा पोलीस

आमची हमी

"धाराशिव जिल्हा पोलीस दल नागरिकांशी संवेदनशील, नि:पक्षपाती व जबाबदार वर्तन ठेवेल आणि कायद्याच्या चौकटीत राहून सर्वोत्तम सेवा देईल."

पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव

दि. 30/01/2025

माहिती अधिकार अधिनियम कलम ४ प्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव अंतर्गत.

'नागरिकांची सनद' (Citizen charter)

1) विभागाचे नाव : धाराशिव पोलीस.

2) संकेतस्थळ : https://osmanabadpolice.gov.in

3) कार्यालयाचे नाव : धाराशिव जिल्हा पोलीस दलात १ पोलीस अधीक्षक कार्यालय असुन त्याअंतर्गत प्रत्येकी - १ असे अपर पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय), कार्यालय अधीक्षक अशी रचना आहे त्या अंतर्गत खालील शाखा पोलीस अधीक्षक कार्यालयात असुन पुढील प्रमाणे उपविभागीय कार्यालये व पोलीस ठाणी जिल्हाभरात आहेत. त्यातून 1 पोलीस अधीक्षक, 1 अपर पोलीस अधीक्षक, 5 पोलीस उप अधीक्षक, पोलीस उप निरीक्षक ते पोलीस निरीक्षक दर्जाचे 126 अधिकारी, 1812 पोलीस अंमलदार अशी आस्थापना आहे.

अ.क्र.धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत शाखाप्रभारी अधिकारी
कार्यालय अधीक्षक, मंत्रालयीन विभागकार्यालय अधीक्षक
नियंत्रण कक्षपोलीस निरीक्षक (निशस्त्र)
पोलीस मुख्यालयपोलीस निरीक्षक (राखीव)
स्थानिक गुन्हे शाखापोलीस निरीक्षक (निशस्त्र)
जिल्हा विशेष शाखापोलीस निरीक्षक (निशस्त्र)
वाचक शाखासहा.पोलीस निरीक्षक (निशस्त्र)
बॉम्ब शोधक व नाशक पथकपोलीस उप निरीक्षक (निशस्त्र)
श््वान पथकपोलीस उप निरीक्षक (श््वान पथक)
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक शाखापोलीस निरीक्षक (निशस्त्र)
10आर्थिक गुन्हे शाखापोलीस उपअधीक्षक
११पोलीस कल्याण विभागसहा.पोलीस निरीक्षक (निशस्त्र)
१२बिनतारी संदेश विभागपोलीस उप निरीक्षक (बिनतारी संदेश)
13मोटार परिवहन शाखापोलीस निरीक्षक (मोटार परिवहन)
१४शहर वाहतुक शाखासहा.पोलीस निरीक्षक (निशस्त्र)
१५सायबर पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)
अ.क्र.उपविभागीय कार्यालयप्रभारी अधिकारीअ.क्र.पोलीस ठाणे/ कार्यालयप्रभारी अधिकारी
धाराशिवपोलीस उप अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारीधाराशिव शहर पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)
आनंदनगर पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)
बेंबळी पोलीस ठाणेसहायक पोलीस निरीक्षक (निशस्त्र)
तुळजापूर उपविभागपोलीस उप अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारीतुळजापूर पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)
तामलवाडी पोलीस ठाणेसहायक पोलीस निरीक्षक (निशस्त्र)
नळदुर्ग पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)
तुळजाभवानी मंदीर पोलीस चौकीपोलीस निरीक्षक (निशस्त्र)
उमरगा उपविभागपोलीस उप अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारीउमरगा पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)
मुरुम पोलीस ठाणेसहायक पोलीस निरीक्षक (निशस्त्र)
लोहारा पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)
कळंब उप विभागपोलीस उप अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारीकळंब पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)
ढोकी पोलीस ठाणेसहायक पोलीस निरीक्षक (निशस्त्र)
येरमाळा पोलीस ठाणेसहायक पोलीस निरीक्षक (निशस्त्र)
शिराढोण पोलीस ठाणेसहायक पोलीस निरीक्षक (निशस्त्र)
भुम उपविभागपोलीस उप अधीक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारीभुम पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)
परंडा पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)
अंबी पोलीस ठाणेसहायक पोलीस निरीक्षक (निशस्त्र)
वाशी पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)

४) धाराशिव पोलीस दलाचे कर्तव्य: कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे अन्वेषण व प्रतिबंध करणे, भारतीय दंड संहितेसहीत अन्य स्थानिक व विशेष कायद्यांची फौजदारी प्रक्रिया संहीता व न्यायालयाच्या अधीन राहुन अंमलबजावणी करणे. यासोबतच समाज जागृती करुन पोलीस जनता सहकार्य वृध्दींगत करणे. शासनाच्या वाजवी ध्येय धोरणाची अंमलबजावणी करणे.

५) धाराशिव पोलीस दलातील अभिलेखांचे वर्गीकरण व जतन कालावधी: महाराष्ट्र पोलीस नियमावली भाग-२ मधील नियम क्रमांक २६२ नुसार अभिलेख वर्गवारी करुन जतन केले जातात.

६) शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेली उपाययोजना: सतर्क व निष्पक्ष पोलीस, स्टुडंट पोलीस कॅडेट, भरोसा कक्ष, ज्येष्ठ नागरीक संवाद, ग्रामसुरक्षा दल, पिंक पथक इत्यादी मार्फत जनजागृती करुन कार्य केले जात आहे.

७) सल्ला देण्यासाठी स्थापन केलेली मंडळ समित्या: या बाबत माहिती लागू नाही.

८) अधिकारी- अंमलदार यांचे वेतन: सातव्या वेतन आयोगातील वेतन श्रेणी नुसार त्यांच्या ऐच्छीक बँक खात्यात दिले जाते.

९) सर्व योजनांचा तपशील, प्रस्तावीत खर्च अर्थसंकल्प, संवितरीत रक्कम: लागू नाही.

१०) अनुदान कार्याक्रम, पध्दत रक्कमा, लाभार्थी बाबतची माहिती: लागू नाही.

११) ज्या व्यक्तींना सवलती, परवाने, प्राधिकार पत्रे दिली त्यांचा तपशील: पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून दिला जात नाही.

१२) इलेक्ट्रॉनिक स्वरुपात उपलब्ध असलेली माहिती: www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर महाराष्ट्र पोलीस दलाची तसेच https://osmanabadpolice.gov.in या संकेत स्थळावर धाराशिव पोलीस दलाची माहिती उपलब्ध आहे.

१३) ग्रंथालय सुविधा: पोलीस मुख्यालयातील ग्रंथालय सकाळी १०.०० ते १४.०० व १५.०० ते २०.०० या वेळेत उपलब्ध आहे.

१४) माहिती कायदा अंतर्गत जन माहिती अधिकारी व प्रथम, द्वितीय अपील अधिकारी यांची माहिती :

अ.क्र.पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत शाखाजन माहिती अधिकारीप्रथम अपील अधिकारीद्वितीय अपील अधिकारी
कार्यालय अधीक्षक, मंत्रालयीन विभागकार्यालय अधीक्षकपोलीस उपअधीक्षक, मुख्यालयमाहिती आयुक्त, खंडपीठ छ.संभाजीनगर
नियंत्रण कक्षपोलीस निरीक्षक (निशस्त्र)
पोलीस मुख्यालयपोलीस निरीक्षक (राखीव)
स्थानिक गुन्हे शाखापोलीस निरीक्षक (निशस्त्र)
जिल्हा विशेष शाखापोलीस निरीक्षक (निशस्त्र)
वाचक शाखापोलीस उप निरीक्षक (निशस्त्र)
बॉम्ब शोधक व नाशक पथकपोलीस उप निरीक्षक (निशस्त्र)
श््वान पथकपोलीस उप निरीक्षक (श््वान पथक)
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक शाखापोलीस निरीक्षक (निशस्त्र)
१०आर्थिक गुन्हे शाखापोलीस उपअधीक्षक
११पोलीस कल्याण विभागपोलीस निरीक्षक (निशस्त्र)
१२बिनतारी संदेश विभागपोलीस निरीक्षक (बिनतारी संदेश)
१३मोटार परिवहन शाखापोलीस निरीक्षक (मोटार परिवहन)
१४शहर वाहतुक शाखापोलीस निरीक्षक
१५सायबर पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)
अ.क्र.कार्यालयाचे नावजन माहिती अधिकारीप्रथम अपील अधिकारीद्वितीय अपील अधिकारी
पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय)पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय)अपर पोलीस अधीक्षकमाहिती आयुक्त, खंडपीठ छ.संभाजीनगर
पोलीस उप अधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा)पोलीस उप अधीक्षक (आर्थिक गुन्हे शाखा)संबंधीत कार्यालयाचे पोलीस उप अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये: धाराशिव, तुळजापूर, उमरगा, कळंब, भुम
पोलीस ठाणे स्तरावर
अ.क्र.पोलीस ठाणे/कार्यालयप्रभारी अधिकारीप्रथम अपील अधिकारीद्वितीय अपील अधिकारी
धाराशिव शहर पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)उप विभागीय पोलीस अधिकारी धाराशिवमाहिती आयुक्त, खंडपीठ छ.संभाजीनगर
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)""""
आनंदनगर पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)""""
बेंबळी पोलीस ठाणेसहायक पोलीस निरीक्षक (निशस्त्र)""""
तुळजापूर पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)उप विभागीय पोलीस अधिकारी तुळजापूरमाहिती आयुक्त, खंडपीठ छ.संभाजीनगर
तामलवाडी पोलीस ठाणेसहायक पोलीस निरीक्षक (निशस्त्र)""""
नळदुर्ग पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)""""
तुळजाभवानी मंदीर पोलीस चौकीपोलीस निरीक्षक (निशस्त्र)""""
उमरगा पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)उप विभागीय पोलीस अधिकारी उमरगामाहिती आयुक्त, खंडपीठ छ.संभाजीनगर
मुरुम पोलीस ठाणेसहायक पोलीस निरीक्षक (निशस्त्र)""""
लोहारा पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)""""
कळंब पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)उप विभागीय पोलीस अधिकारी कळंबमाहिती आयुक्त, खंडपीठ छ.संभाजीनगर
ढोकी पोलीस ठाणेसहायक पोलीस निरीक्षक (निशस्त्र)""""
येरमाळा पोलीस ठाणेसहायक पोलीस निरीक्षक (निशस्त्र)""""
शिराढोण पोलीस ठाणेसहायक पोलीस निरीक्षक (निशस्त्र)""""
भुम पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)उप विभागीय पोलीस अधिकारी भुममाहिती आयुक्त, खंडपीठ छ.संभाजीनगर
परंडा पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)""""
अंबी पोलीस ठाणेसहायक पोलीस निरीक्षक (निशस्त्र)""""
वाशी पोलीस ठाणेपोलीस निरीक्षक (निशस्त्र)""""

धाराशिव जिल्हा पोलीस विभागाकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची सुची व त्यांची कालमर्यादा इत्यादी माहिती खालीलप्रमाणे.

अ.क्र.लोकसेवा तपशीलकालमर्यादासेवा देणारे संबंधीत कार्यालय
तक्रारदारास प्रथम खबर अहवाल (FIR) ची प्रत पुरविणेनोंदणी नंतर लगेच विनामुल्य पुरविणेसंबंधीत पोलीस ठाण्याचे अंमलदार
ध्वनीक्षेपक परवाना देणेकार्यालयीन कामकाजाच्या ३ दिवसातप्रभारी अधिकारी, संबंधीत पोलीस ठाणे
मनोरंजन कार्यक्रमांना नाहरकत परवाना देणेकार्यालयीन कामकाजाच्या २१ दिवसातप्रभारी अधिकारी जिल्हा विशेष शाखा
सभासंमेलन, मिरवणुक शोभा यात्रा इत्यादीस परवानगी देणेकार्यालयीन कामकाजाच्या ७ दिवसातप्रभारी अधिकारी, संबंधीत पोलीस ठाणे
विदेशी नागरीकांना निवासास मुदतवाढ/ नाहरकत प्रमाणपत्र देणेकार्यालयीन कामकाजाच्या ७ दिवसातप्रभारी अधिकारी जिल्हा विशेष शाखा
भारत देशात परतण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देणेकार्यालयीन कामकाजाच्या ७ दिवसातप्रभारी अधिकारी जिल्हा विशेष शाखा
पारपत्र पडताळणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देणेकार्यालयीन कामकाजाच्या २१ दिवसातप्रभारी अधिकारी जिल्हा विशेष शाखा
शासकीय, खाजगी संस्थामधील नोकरी इत्यादीकामी वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणेकार्यालयीन कामकाजाच्या ३० दिवसातप्रभारी अधिकारी जिल्हा विशेष शाखा
पेट्रोलियम विक्री केंद्र, हॉटेल, मद्य विक्री व बार, शस्त्र परवाना इत्यादी कामी नाहरकत प्रमाणपत्र देणेकार्यालयीन कामकाजाच्या २१ दिवसातप्रभारी अधिकारी जिल्हा विशेष शाखा
१०भारतीयांना विदेशात जाण्यासाठी तर तिबेटी नागरीकांना भारतात येण्यासाठी पोलीस अनुमती प्रमाणपत्र देणेकार्यालयीन कामकाजाच्या १५ दिवसातप्रभारी अधिकारी जिल्हा विशेष शाखा

ही नागरीकांची सनद धाराशिव पोलीस दलातील प्रत्येक कार्यालयाच्या दर्शनी भागात अशा प्रकारे प्रसिध्द करावी की, जेणेकरुन कार्यालयात येणाऱ्या लोकांना तिचे वाचन करणे शक्य होईल, तसेच या सनदेची पीडीएफ प्रत उस्मानाबाद पोलीस दलाच्या संकेत स्थळावर कायमस्वरुपी ठेवण्यात येउन प्रति वर्षी १ मे पुर्वी ही सनद अद्ययावत करुन नवीन सनद उपलब्ध करण्यात येईल.

(संजय जाधव) भा.पो.से.

पोलीस अधीक्षक, धाराशिव

प्रत कार्यवाहीस :

१) अपर पोलीस अधीक्षक, धाराशिव

२) पोलीस उप अधीक्षक मुख्यालय, आर्थिक गुन्हे शाखा, धाराशिव

३) सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालये, धाराशिव जिल्हा.

४) प्रभारी अधिकारी, सर्व पोलीस ठाणी व मंदीर चौकी, धाराशिव जिल्हा.

५) प्रभारी अधिकारी, सर्व शाखा पोलीस अधीक्षक कार्यालय.