
धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातून सायबर सुरक्षा जनजागृती व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या उपस्थितीत रॅलीचा शुभारंभ झाला. यामध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार व विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सायबर गुन्हेगारी, ऑनलाईन फसवणूक टाळण्याचे उपाय आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सतर्क राहावे व सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.